नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर केंद्राने पवार साहेबांना दिली होती तर ती ऑफर न स्वीकारण्या इतके पवार साहेब कच्च्या गुरूचे चेले नाहीत, असा पलटवार पाटलांनी मध्यमानशी बोलताना केला.
कोळश्याच्या टंचाईवरूनही त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. काही झालं तरी त्याचं खापर किंवा दोष केंद्राकडे देऊन मोकळे होतात. कोळसा कमी आहे, केंद्राने कोळसा दिला नाही, असं सांगितलं जात आहे. पण पावसामुळे कोळसा कमी मिळेल. कोळश्याचा स्टॉक करून ठेवा हे केंद्राने आधीच सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिलं.