पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या; या राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

pune murder- ajit pawar- TOD Marathi

पुणे: पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं अमिताभ गुप्तांनी सांगितलं.

माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता. आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती आणि त्याच दरम्यान आरोपी तिथे आला आणि त्याने कोयत्याने वार करत तिची हत्या केली.

या दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Please follow and like us: