TOD Marathi

टिओडी मराठी, मेलबर्न, दि. 18 मे 2021 – जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोनाला आता नष्ट करणारी थेरेपी विकसित केली आहे. ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना यश आलं आहे. त्यामुळे आता हे वृत्त जगाला दिलासादायक ठरत आहे.

करोनावर मत करण्यासाठी अनेक देशांनी करोना प्रतिबंधक लसही बाजारात आणली. मात्र लस घेतल्यानंतरही अनेकांना करोनाची लागण होऊ लागली. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र, करोनाचा विषाणू 99.99 टक्के संपविणारी थेरपी विकसीत करण्यात ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना यश आलंय.

ऑस्ट्रेलियाच्या मेंजीस हेल्थ इन्स्टिट्युट क्वीन्सलॅंडच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमने ही थेरेपी विकसित केलीय. हे तंत्रज्ञान एका क्षेपणास्त्रासारखे काम करते. ते आधी आपल्या टार्गेटला शोधते आणि मग त्याला नष्ट करते, अस वैज्ञानिकांच्या टीममधील सदस्यांनी म्हटलंय.

या थेरपीमध्ये, करोनाला प्रतिकृती बनवण्यापासून रोखले जाते. जेणेकरून करोना विषाणूंची संख्या वाढण्यापासून रोखली जाते. यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, असे संशोधन टीमच्या सदस्या नाईगेल मॅकमिलन यांनी सांगितलं आहे.

तसेच हे आधुनिक तंत्रज्ञान एका हीट-सिकिंग मिसाईलसारखे काम करते. हे तंत्रज्ञान अगोदर करोनाच्या विषाणूंची ओळख पटवते आणि त्यानंतर त्यावर हल्ला करते, असंही त्या म्हणाल्या.

या दरम्यान ही थेरेपी जीन सायलेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. जीन सायलेन्सिंग थेरेपीचा शोध 1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियात लावण्याला होता. श्वसनाशी संबंधित आजारांवर जीन सायलेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या थेरेपीत विषाणूंचा शोध घ्या आणि त्याला नष्ट करा, अशी कार्यपद्धती आहे. या थेरेपीच्या मदतीने व्यक्तीच्या श्वसननलिकेत किंवा फुफ्फुसात असलेल्या विषाणूंना नष्ट करता येतं.

या थेरेपीमध्ये नॅनो पार्टीकलला इंजेक्शनच्या माध्यमातून शरिरात सोडले जातात. हे नॅनोपार्टीकल फुफ्फुसात जावून आरएनए तयार करणाऱ्या पेशींत मिसळून जातात. त्यानंतर ते आरएनएमधील विषाणूंचा शोध घेऊन त्यांच्या जीनोमला संपवतात. त्यामुळे करोनाचा विषाणू दुसऱ्या विषाणूंना जन्म देऊ शकत नाही.