TOD Marathi

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केलेली इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या बुधवारी म्हणजेच २० जुलैला होणार होती, आता ही परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेने दिली आहे.(the Fifth and Eighth class Scholarship Examinations will be held on July 31)
राज्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जातात. राज्यात एकाच दिवशी या परीक्षा घेतल्या जातात. या वर्षीच्या परीक्षेसाठी मागील काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. राज्यातील ५७०७ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २० जुलै रोजी एकाच वेळी या परीक्षा घेतल्या जाणार होत्या मात्र, आता ही तारीख रद्द करत ३१ जुलै २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. (Heavy rainfall across Maharashtra)
शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.