TOD Marathi

अहमदनगर : गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देणे म्हणजे बेरोजगार तरुणांची चेष्ठा केल्यासारखी असल्याची टीका युवक काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. तांबे म्हणाले, अनेक दिवसांपासून नोकरभरती निघाली नाही. त्यात राज्य सरकारने गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे. (Satyajeet Tambe Opposed CM Decision to give Reservation to Govindas in Govt jobs)

दरम्यान गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला समाजातील विविध स्तरातुन विरोध केला जात आहे. या निर्णयानंतर अनेक विद्यार्थी संघटनांनीही विरोध नोंदवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील निर्णयाचा कडाडून विरोध केला. (Ajit Pawar Opposed CM Decision)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दहीहंडी उत्सव आणि गोविंदांसाठी मोठ्या घोषणा केल्या. (CM Eknath Shinde Announcement) दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आलाय. गोविंदांना राज्य सरकारच्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये मिळणार आहे. तसेच दहीहंडीला शासकीय सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती.

दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना 7 लाख 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.