TOD Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Announcement) यांनी गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची भूमिका विधानसभेत मांडली आणि तशी घोषणाही केली. ही घोषणा केल्यानंतर याला विविध स्तरातून विरोध सुरू झाला. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar Criticized Govt) यांच्यासह अनेकांनी विरोध केला असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली आहे. (Chandrakant Patil was in Pune)

मंगळागौर, विटी दांडू अशाही गोष्टींचा खेळात समावेश केला तर अडचण काय? खेळांसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणात मंगळागौरही जाईल. अन्य भारतीय खेळ जी दुर्मिळ होत चालली आहेत, त्यांनाही घ्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं.

याबद्दल बोलत असताना कोल्हापुरात सुरू केलेल्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ या उपक्रमाचा संदर्भही चंद्रकांत पाटील यांनी दिला. त्यामुळे विरोधकांनी विरोध केला असला तरी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे असं दिसतंय.

तर सरकारच्या गोविंदाच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘कुठल्या निकषांवर या गोष्टी ठरवणार आहेत? मुख्यमंत्र्यांनी भावनात्मक निर्णय घ्यायचे नसतात. ही गोष्ट करत असताना क्रीडा विभागाला तरी विश्वासात घेतलं का?’अशी टीका अजित पवारांनी केली.