TOD Marathi

नवी दिल्ली :

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते, मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू असून, 10 ऑगस्टपासून त्यांना दाखल करण्यात आले आहे. (Comedian Raju Shrivastav)

 

राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा यांनी पतीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. शिखाने राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत पसरणाऱ्या अफवांना त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. 10 ऑगस्ट रोजी सकाळी राजू श्रीवास्तव जिममध्ये वर्कआउट करत असताना बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्या दिवसापासून आजतागायत त्यांना शुद्ध आलेली नाही.

 

राजू श्रीवास्तव यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. शेखर सुमन यांनीही ट्विटरवर त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी नुकतच सांगितलं की, तो अजूनही बेशुद्ध आहे पण स्थिर आहे. त्यांना बरे होण्यासाठी आणखी आठवडाभर लागेल.