“So Called चाणक्य, बडवे…”; एकनाथ शिंदेंचा रोख संजय राऊतांकडे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल संध्याकाळी राज्यातील जनतेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी बंडखोर नेत्यांना देखील परत येऊन सोबत बसून चर्चा करण्याचे आवाहन केले आणि शिवसैनिक मुख्यमंत्री होत असेल तर मी मुख्यमंत्रीपद आनंदाने सोडायला तयार आहे, असंही म्हटलं. मात्र त्यांच्या या आवाहनानंतरही बंड केलेले शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) ऐतिहासिक सत्ताबदलाच्या दिशेने जाण्याची चिन्हं आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी- काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिवसेना नेतृत्वावर आपण नाराज नाही, असंही ते म्हणाले होते.

एकनाथ शिंदेंनी नुकतंच ट्वीट करत एक पत्र शेअर केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं ते पत्र आहे. यामध्ये गेल्या अडीच वर्षात आम्हाला कशा पद्धतीने वागणूक देण्यात आली, मुख्यमंत्र्यांना भेटू देण्यात आलं नाही, तासनतास ताटकळत ठेवण्यात आले असे अनेक महत्त्वाचे मुद्दे या पत्रामध्ये आहेत. (MLA Sanjay Shirsat write a letter to Uddhav Thackeray)

सो कॉल्ड चाणक्य, बडवे असे अनेक गंभीर शब्द देखील या पत्रामध्ये वापरलेले आहेत, त्यामुळे शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्नही उपस्थित होतो.

Please follow and like us: