मुंबई : शौचालय घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र आता सोमय्या याचविरोधात राऊतांवर १०० कोटींचा दावा दाखल करणार आहेत.
सोमय्यांनी ट्वीटरवच्या माध्यमातून पत्नी मेधा सोमय्या याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. सोमय्या म्हणाले की, मेधा सोमय्या 18 मे रोजी सकाळी 11 वाजता शिवडी कोर्ट मुंबई येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल मानहानीचा दावा दाखल करणार आहेत.
Prof Dr Medha Kirit Somaiya will file Criminal Defamation Suit/Complaint at Sewri Court Mumbai on 18 May against Shivsena Sanjay Raut for harrasment and defamation ( IPC 499, 500) in the name of ₹100 Crore Toilet Scam
Defamation Notice was given, Complaint was filled earlier pic.twitter.com/e6uwoDLEFD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 16, 2022
दरम्यान मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. संजय राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रतीसवालही सोमय्यांना विचारला होता.