TOD Marathi

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराधानी नागपूरला जोडणारा विशाल प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. या प्रकल्पाची घोषणा 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली होती. पण हाच प्रकल्प आता अगदी पूर्णत्वाकडे येऊन पोहचलाय. आणि लवकरच या महामार्गनं आपल्याला प्रवासही करता येणार आहे.

कारण या प्रकल्पाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा सलग सात वर्षानंतर पूर्ण झाला आहे. याच टप्याचे लोकार्पण दिवाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यापूर्वी सरकारकडून ऑक्टोंबर 2021, 31 डिसेंबर 2021, आणि आत्ता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली आहे. परंतु अजून सुद्धा अगदी महामार्गाचे काम पूर्ण असल्याची माहिती आहे. आता ऑक्टोंबर महिन्यात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.