TOD Marathi

औरंगाबाद : भाजपाचे आमदार प्रशांत बंब (prashant bamb) यांनी शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर बंब आणि शिक्षक यांच्यात बरीच हमरी तुमरिही झाली. पण आता या वादावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, सर्वसाधारणपणे दुर्गम भागामध्ये शिक्षकांनी मुख्यालयी राहणे अपेक्षित असते. तसेच जे शिक्षक जवळ राहत असतील किंवा ते वाहन वापरत असतील, असे सर्व मुद्दे तपासून घेतले पाहिजे. पण एका टोकाला जाऊन दोन्ही बाजूने आडमुठेपणाची भूमिका घेणं योग्य राहणार नाही.

मुंबई यांनी केलेले सर्व आरोप तपासले जातील यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे शिक्षक संघटनांसोबतही यावर चर्चा केली जाईल, असं आवाहनही केसरकरांनी यावेळेस दिलं.

दरम्यान विद्यार्थ्यांची गुणवत्ता यालाच प्राधान्य असून त्यात आम्ही कोणतीच कमी पडू देणार नाही असं आश्वासन द्यायलाही केसरकर विसरले नाहीत.