TOD Marathi

पुष्पा फेम समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही.
समंथाने तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही ती तितकीच फेमस आहे.
समांथा रुथ प्रभूची गणना दक्षिणेतील लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.
दक्षिणेतील चित्रपट निर्मातेच नाही तर बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांनाही समांथासोबत काम करायचे आहे.लोकप्रियतेच्या बाबतीत समांथा रुथ प्रभूने आलिया भट्टला कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणलाही मागे टाकले आहे.समांथा रुथ प्रभू सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत देशातील नंबर वन स्टार आहे.
Ormax देशातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सची यादी प्रसिद्ध करते.

अभिनेत्रीचे स्टारडम दिवसेंदिवस वाढत आहे आणि तिने स्वतःला एक उत्तम स्टार म्हणून सिद्ध केले आहे.
समांथाला नुकतेच मायोसिटिस नावाच्या आजाराचे निदान झाले. ज्यासाठी तिला काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, ती हळूहळू बरी होत आहे आणि आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे.

समंथा रुथ प्रभू सध्या साऊथ सिनेमाची डिमांडिंग अभिनेत्री बनली आहे. नुकताच तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.