नाशिक : एका आठवड्याच्या आत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं दखल घेतली नाही तर ही शेतकऱ्याची पोरं मंत्रालयावर चालून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील रुई येथे आयोजित करण्यात आलेल्या कांदा परिषदेत ते बोलत होते. कांदा परिषदेच्या व्यासपीठावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ( Sadabhau Khot ultimatum to state government )
खोत म्हणाले की, जेव्हा 2017-18 ला कांद्याचा दर पडला होता. त्यावेळी काही कार्यकर्ते माझ्याकडे आले. तेव्हा कांद्यावरची निर्यात शुल्क शुन्य करायचा निर्णय आम्ही घेतला होता. यानंतर इतर राज्यांनीही कांद्याला वाहतूक अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच गुजरात सरकार कांद्याला प्रति किलो तीन रुपयांचे अनुदान देत आहे. तुम्ही किमान पाच रुपये तरी अनुदान द्या, अशी मागणीही यावेळेस खोत यांनी केली आहे. ( Sadabhau Khot Demand )