TOD Marathi

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं राज्याचं राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. राज्य सरकारनं अनेक मागण्या मान्य केल्यानंतरही अनेक कर्मचारी नोकरीवर रुजू झाले नव्हते.  या प्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र सरकारनं आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ( S T Worker Job Guaranty )

कामावर असताना एखाद्या एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला निलंबित न करता महामंडळाकडून त्याचा सांभाळ केला जाणार आहे. विशेष म्हणजे अशा कर्मचाऱ्यांना नोकरीत जे काही काम करता येईल, अशी कामही दिले जातील. तर काहींना अनुकंपा तत्वावर सेवेत दाखल करून घेण्यात येणार आहे. ( disability st employee the job will be maintained )

राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या आदेशात यासंबंधी निर्णय देण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्याला नोकरीवरती असताना अपंगत्व आलं असेल, अशा कर्मचाऱ्यांची चार आठवड्यात तपासणी करून त्याची दोन आठवड्यात पडताळणी करावी, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आले आहेत. प्रमाणपत्राची खात्री झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या योग्यतेनुसार नोकरी देण्यात येणार आहे.

समजा एखादा कर्मचारी वैद्यकीयदृष्ट्या कोणतेही काम करण्यास सक्षम नसेल किंवा त्याच्यासाठी कोणतेही समकक्ष पद उपलब्ध नसल्यास त्याची नियुक्ती अधिसंख्य पदावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तीवेतन पिएफ इत्यादी फायदे मिळणार नाहीत.