टिओडी मराठी, दि. 16 जुलै 2021 – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत देशासोबत मैत्रीचे संबंध व्हावेत, अशी आमचीही इच्छा आहे. पण, भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा यामध्ये अडथळा येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या उजबेकिस्तानच्या दौऱ्यावर इम्रान खान आले आहेत. मध्य व दक्षिण आशियाई देशांच्या दोन दिवसांची परिषद ताश्कंदमध्ये होणार आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी इम्रान खान ताश्कंदमध्ये दाखल झालेत.
यावेळी एएनआयच्या प्रतिनिधींने त्यांना भारत – पाकिस्तान चर्चेबाबत विचारले असता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, दोन्ही देशांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे.
आम्ही भारत देशाची प्रतिक्षा करत आहोत. पण, दोन्ही देशांच्या संबंधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा अडथळा येत आहे. तालिबान आणि पाकिस्तानच्या संबंधाबाबत प्रश्न पूर्णपणे विचारण्याअगोदर इम्रान खानी यांनी पत्रकाराला टाळले.
यादरम्यान, अफगाण शांतता संमेलनाचे पाकिस्तानने आयोजन केलं आहे. यात अफगाणिस्तानमधील अनेक नेत्यांना आमंत्रित केलं आहे. अफगाणिस्तान सरकारच्या वतीने कोण सहभागी होईल?, याबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही. तर, तालिबानने या संमेलनात उपस्थित राहण्यास नकार दिलाय.