Indian journalist दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या ; दहशतवाद्यांनी Afghan Special Forces वर केला हल्ला

टिओडी मराठी, दि. 16 जुलै 2021 – भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्धीकी यांची हत्या केली आहे. ते अफगणिस्तानातील कंदहार इथे अफगाण स्पेशल फोर्ससोबत राहून फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत होते.

तालिबानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया आणि त्याबाबतचे वृत्तांकन जगापुढे मांडण्याचं काम दानिश करत होते. हे काम करत असतानाच त्यांची हत्या झाली आहे.

मूळचे मुंबईचे असलेले दानिश ४० वर्षांचे होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन केलंय. त्यांना पुलित्झर पुरस्कारही मिळाला होता.

दहशतवाद्यांनी अफगाण स्पेशल फोर्सच्या तुकडीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अफगाण स्पेशल फोर्सला प्रतिकार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. या काळात दहशतवाद्यांनी सिद्धीकी यांची हत्या केली गेली आहे.

दानिश रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या दिल्ली ब्युरोतील मुख्य फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करत होते. अफगानिस्तानचे राजदूत फरीद ममूनद्जे यांनी दानिश यांची हत्या झाल्याचे ट्विट करून सांगितलं आहे. याअगोदर मागील महिन्यामध्ये १३ जूनला झालेल्या हल्ल्यातून दानिश बचावले होते.

Please follow and like us: