TOD Marathi

कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् जागेवर उलटला; ‘येथील’ रिक्षाचा अपघात कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ होतोय व्हायरल

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पिंपरी चिंचवड, दि. 17 मे 2021 – रस्त्याकडेला शांतपणे उभ्या असलेल्या कुत्र्याला चालत्या रिक्षातून लाथ मारणं एका रिक्षाचालकाला महागात पडलं. कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षासह जागेवर उलटला, हा रिक्षाचा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अपघात पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत घडला आहे.

या अपघातात चालक रिक्षाबाहेर फेकला गेला. यानंतर नियंत्रणाबाहेर गेलेल्या रिक्षाने दुभाजक ओलांडला. पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्र्याला लाथ मारण्याचा खोडसाळपणा चालकाच्या अंगलट आला.

पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कुत्र्याला चालत्या रिक्षातून लाथ मारण्याचा प्रयत्न चालक करताना हा अपघात झाला. यावेळी रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन नसल्याने मोठा अपघात टळला.

हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालंय. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षा चालकाला पाय फुटेजमध्ये स्पष्ट दिसतोय. विशेष म्हणजे दुभाजक आणि रिक्षा यांच्यात अंतर होतं. त्यामुळे रिक्षाचालकाने दुभाजकाच्या जरा जवळून रिक्षा नेली असती, तर हा प्रकार घडला नसता. पण, कुत्र्याला लाथ मारण्यासाठी चालकाने रिक्षा त्याच्या जवळून नेली आणि त्याच्या रिक्षावरील ताबा सुटून अपघात झाला.

Rickshaw driver accident ‘Pimpri’ captured in CCTV, video goes viral