TOD Marathi

Heart Attack : हिरव्या भाज्या खाल्याने हृदयविकाराचा धोका होतोय कमी; ‘इथल्या’ संशोधकांची माहिती

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, सिडनी, दि. 17 मे 2021 – हृदयविकाराचा आजार असेल तर काळजी घ्या, असे सांगितले जाते. त्यामुळे दररोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश असेल तर, हृदयविकाराचा धोका 25 टक्‍क्‍यांनी कमी होत आहे, असा निष्कर्ष काढला आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू लेडीज कावेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ५० हजार रुग्णांवर संशोधन करून हा निष्कर्ष प्रसिद्ध केलाय.

या संशोधनासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे दररोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश असेल तर हृदयविकाराचा धोका कमी होतो. हिरव्या पानांच्या भाज्यांत नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित होतो. सध्या जगभरात करोनाने थैमान घातले असले तरी दरवर्षी हृदयविकाराने दोन कोटी पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत असतो.

नैसर्गिक मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयविकार हे सर्वात महत्त्वाचे कारण मानले जाते विद्यापीठाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, डेन्मार्कमधील ५० हजार लोकांवर संशोधन केलेले हे संशोधन गेली 23 वर्षे सतत सुरू होते. ज्या लोकांनी गेल्या २३ वर्षाच्या कालावधीमध्ये दररोज आहारात हिरव्या पानांच्या भाज्या घेतल्या. त्यांचा हृदयविकाराचा धोका बारा ते 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे समजले.

संशोधनाच्या प्रमुख डॉक्टर कॅथरीन बॉंडेंन यांनी दिलेली माहिती अशी, शरीरातील रक्तवाहिन्या पातळ होण्याचा धोकाही हिरव्या भाज्या आहारात ठेवल्यामुळे कमी होतो. हिरव्या भाज्यांमधून नायट्रेट मिळते. तसेच लोकांनी नायट्रेटचे कृत्रिम सप्लिमेंट वापरणे टाळावे, असाही सल्ला या संशोधकांनी दिलाय.

पालक आणि या प्रकारातली इतर भाज्या नेहमीप्रमाणे आहारात घ्याव्यात, या भाज्यांचे सूप करून घेतले तर त्याचा त्या प्रमाणात फायदा होत नाही असे सांगितले आहे