रिचा आणि अली यांची लग्नपत्रिका आहे फारच भन्नाट; तुम्ही एकदा पाहाच!

बॉलिवूड स्टार कपल रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असतात. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. लग्नाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहितीही सर्वांसमोर आली आहे. लग्नाच्या तारखेपासून ते स्थळापर्यंतचा खुलासा झाला आहे.आता चाहत्यांना ही जोडी कधी एक होणार याची वाट प्रेक्षक पाहत आहे.

पण लग्नपत्रिकेशिवाय प्रत्येक विवाह अपूर्ण असतो. अशा परिस्थितीत आता रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नपत्रिकेची (Wedding Card)पहिली झलक समोर आली आहे. या जोडप्याच्या लग्नपत्रिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे कार्ड अतिशय अद्वितीय आहे. आजपर्यंत अशी लग्नपत्रिका तुम्ही पाहिली नसेल.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या कार्डचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Wedding Card Photos Viral On Social Media) होत आहेत. कार्डला थोडा जुना टच आहे.
त्यामुळे ती लग्नपत्रिका रेट्रो फील देत आहे. ही लग्नपत्रिका या दोघांच्या मित्राने डिझाइन केलेले आहे. हे लग्न पत्रिका मॅचबॉक्सच्या आकारात बनवण्यात आली आहे. आणि त्यावर रिचा आणि अलीच्या चेहऱ्याचे रेखाटन करण्यात आले आहे. हे पूर्णपणे 90 च्या दशकाचा रेट्रो फील देत आहे, त्यावर लिहिले आहे, कपल मॅचेस. फोटोमध्ये रिचा आणि अली पारंपरिक कपड्यांमध्ये सायकल चालवताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कपल पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीचे छोटे छोटे विधी सुरू झाले आहेत. 6 ऑक्टोबरला लग्न होणार आहे, तर रिसेप्शन 7 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. याशिवाय 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहेत. त्याच वेळी, बिकानेरचे 175 वर्षीय रोखपाल ज्वेलर्स कुटुंब ऋचाच्या दिल्लीतील फंक्शनसाठी तिचे दागिने तयार करत आहे

Please follow and like us: