नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील अपना सहकारी बँक ७९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) वर्गीकरणासह काही सूचनांचे पालन न केल्यामुळे अपना सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
बँकेच्या वैधानिक तपासणीवरून असे दिसून येते की त्याने एनपीए वर्गीकरण, मृतांच्या चालू खात्यातील रकमेवर व्याज भरणे किंवा दाव्यांची पूर्तता न करणे आणि बचतीवरील किमान शिल्लक न ठेवल्याने लागणारे शुल्क आदि नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
अपना सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ३१ मार्च २०१९ रोजी वैधानिक तपासणी करण्यात आली होती. अपना सहकारी बँकेला प्रथम नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र आरबीआयच्या सुचनांचे उल्लंघन केल्यामुळे अखेर या बँकेवर कारवाई करण्यात येणार आहे.