TOD Marathi

हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आज मुंबईत मतदानासाठी आले. राज्य सरकारनं मला अटक केली असती, म्हणून दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो आणि आज मतदानासाठी आलो, असे सांगून आज त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरून राणा दाम्पत्याने राज्यभर कल्लोळ उडविला होता. त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रचंड गदारोळ झाला. हनुमान चालिसा सोबत ठेवून मी कोणताही गुन्हा करीत नाही. ती माझ्याकडे नेहमी असतेच आणि आत्ताही आहे, असे आमदार राणा (MLA Ravi Rana) यांनी यावेळेस बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान मी जर पोलिसांना दिसलो जरी असतो, तर कुठल्याही क्षणी मला अटक करण्यात आली असती. हे जाणून असल्यामुळे मला माझी सुरक्षा करावी लागली. आता पोलिस मला रोखू शकत नाही. मी मतदान करणारच. आतमध्ये हनुमान चालिसा घेऊन जाणार आणि भाजपचे सर्व उमेदवार निवडून येणार, असेही आमदार राणा आज म्हणाले.