TOD Marathi

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला होता. तसेच शिवसेना आम्ही बनवली तेव्हा संजय राऊत शिवसेनेत नव्हते असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या टीकेला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

विक्रोळीचे आमदार सुनील राऊत म्हणाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की संजय राऊत हे गेली ३५ वर्ष सामनाची धुरा सांभाळत आहेत. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एवढा मोठा पेपर संजय राऊत यांच्या हातात दिला याचा अर्थ संजय राऊत यांच्यावर या दोघांचाही विश्वास होता.

हेही वाचा : “…योग आणि ध्यान महत्त्वाचे, आ. सत्यजीत तांबे यांनी विशद केलं योगासनांचं महत्त्व

रामदास कदम जे बोलतायत की, संजय राऊतांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की, ते राष्ट्रवादीचे आहेत की, शिवसेनेचे. त्यावर मी इतकंच म्हणेन की, आधी रामदास भाईंनी आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की, ज्या ज्या वेळी तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा काय चर्चा झाली होती?

सुनील राऊत म्हणाले, रामदासभाई तुम्ही जेव्हा जेव्हा संजय राऊतांना भेटायला घरी आलात त्या त्या वेळी तुम्ही राष्ट्रवादीत जाण्याच्या गोष्टी केल्यात की नाही. तुम्ही म्हणालात की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं आहे. त्यासाठी शरद पवार साहेबांशी बोलून घ्या, तुम्ही संजय राऊत यांच्याकडे अशी मागणी वारंवार केली. रामदास भाई संजय राऊतांना म्हणाले की, तुम्ही पवार साहेबांशी बोललात तर माझं राष्ट्रवादीत बस्तान बसेल.