TOD Marathi

नॅशनल हेरॉल्ड (National Herald matter) प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ( Sonia Gandhi, Rahul Gandhi) यांना समन्स बजावला होता.  दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सोनिया गांधी ईडीच्या चौकशीला हजर राहू शकल्या नव्हत्या आणि त्यानंतर त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडीच्या कार्यालयात दाखल होत आहेत. त्यासाठी ते काँग्रेस मुख्यालयातुन ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत.

ईडीच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांसह, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभाग घेतलेला आहे. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) स्वतः या मोर्चात सहभागी आहेत. देशभरातील काँग्रेसचे खासदार आणि कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत. (Congress protest against ED)

राहुल गांधी झुकणार नाहीत, आम्ही आमचं काम करत राहू असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांना समन्स बजावल्यानंतर आज देशभरात ईडीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबई आणि नागपुर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.