राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Rahul Gandhi- Karnataka - drugs - TOD Marathi

बांगरुळू: काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्सची तस्करी सुद्धा करतात असं धक्कादायक वक्तव्य कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

राहुल गांधी कोण आहेत, मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्ज तस्करदेखील आहेत. हे मीडियात आलं होतं. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही, असं नलीन कुमार कटील यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे त्यात भर पडली आहे.

सध्या राज्यात त्याच सोबत देशात राजकारण कुठले वळण घेत आहे हेच कळत नाहीये. एकमेकांवर टीका, आरोप, प्रत्यारोप करण्यासाठी कुठल्या थराला जातोय याचेही साधे भान राजकीय नेत्यांना राहत नाहीये. महाराष्ट्रात सध्या विरोधकांवर टीका करताना कमी प्रतीचा गांजा ओढतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यातच आता राहुल गांधींना देखील ड्रग्सचं व्यसन असल्याचे वक्तव्य करून आणखी वाद निर्माण केला आहे.

Please follow and like us: