TOD Marathi

पुणे: दौंड तालुक्याचे आमदार राहुल सुभाष कूल व पुणे जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन राहूल कूल यांनी सहकुटुंब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीमध्ये सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी याने विषयांवर चर्चा केली त्याच सोबत पुणे – दौंड लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

यावेळी दौंड रेल्वे जंक्शन व नवीन कॉर्ड लाईन स्टेशन वरील अपुऱ्या सोयी सुविधा, दौंड-पुणे मासिक पास संदर्भातील अडचणी, बोरीबेल खोरोडी येथील आरयुबी, कुरकुंभ मोरीचे रखडलेले काम आदी कामांसंदर्भात चर्चा केली.

त्याच सोबत भविष्यातील गरज लक्षात घेऊन दौंड जंक्शनला उपनगरीय दर्जा मिळावा व पुणे – लोणावळा लोकलच्या धर्तीवर पुणे – दौंड लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी केली. याप्रसंगी दिल्लीमध्ये आदित्य कूल सुद्धा उपस्थित होते, यावरून कूल कुटुंबाचा राजकीय वारसा चालवण्यासाठी चिरंजीव आदित्य आत्तापासूनच चर्चेमध्ये सोबत आहेत. याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे.