TOD Marathi

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा भावनिक सवाल क्रांती रेडकरने पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सध्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलाच हल्ला चढवला आहे. ड्रग्स प्रकरण एकीकडे राहिलं आता थेट समीर वानखेडे यांच्या जातीवर प्रकरण आणलं गेलंय. त्यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापत आहे. आशातच आता समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र पाठवलं आहे.

आमचा काहीही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.
आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे भावनिक पत्र तिने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.