कोल्हापूर:
कोल्हापूरची ओळख तांबड्या- पांढऱ्या रस्स्यासाठी, रांगड्या स्वभावासाठी सर्वत्र आहे. इथले सगळेच विषय हे हार्ड असतात, मग कोल्हापूरकर प्रेमात तरी कसं मागं राहतील? तर हा किस्सा आहे प्रेमाचा. कोल्हापुरातल्या एका तरुणाने रस्त्याच्या कडेला मोठं होर्डिंग लावून त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे. या होर्डिंगची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
या होर्डिंगचे आणि सौरभ-उत्कर्षाचे प्रपोज करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रपोज़ची चर्चा सर्वत्र रंगली असून अनेक कपल्सला ही नवीन आयडीया मिळाली आहे.
प्रत्येक मुलीची एक इच्छा असते की मला प्रपोज असं करावं की याआधी कोणीच कोणाला केलं नसेल. तसा प्रयत्नही अनेकजण करतात, वेगवेगळ्या शक्कल लढवतात, त्यामध्ये काही अनोख्या पद्धतीने केलेले प्रपोज़ हे अनेकांच्या लक्षातही राहतात. अशाच अनोख्या पद्धतीने कोल्हापुरातल्या सौरभ कसबेकरने उत्कर्षा हीला चक्क मोठं होर्डिंग लाऊन प्रपोज केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या मुलगीने सुद्धा त्याला होकार दिला आहे. एव्हढंच काय तर त्या मुलीच्या आणि मुलाच्या घरचे सर्वजणसुद्धा यांच्या नात्यासाठी तयार झाले आहेत.
आहे ना विषय हार्ड?