TOD Marathi

मुंबई:
राज्यात झालेल्या सत्तातंरानंतर मुंबै बँकेतही सत्तापालट होणार, अशी चर्चा होती. मुंबै बँकेचे (Mumbai District Bank) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. तर सिद्दार्थ कांबळे हे उपाध्यक्ष राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या राजकीय खेळीमुळे गमावलेले मुंबै बँकेचे अध्यक्षपद भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना पुन्हा स्वत:कडे खेचून आणण्यात यश आलं आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या मुंबै बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दरेकर यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी १७ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या तर चार जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्येही प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने बाजी मारली होती. त्यामुळे प्रवीण दरेकर हेच परत एकदा मुंबै बँकेचे अध्यक्ष होतील, असे सांगितले जात होते. परंतु, मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी भाजपाला धक्का दिला होता. (Ajit Pawar and Milind Narvekar) सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपद पुन्हा स्वत:कडे खेचून आणले आहे.

प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मजूर असल्याचं दाखवून आणि १९९९ पासून २०२१ पर्यंत मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर मजूर प्रवर्गातून निवडून येऊन नागरिकांबरोबरच सरकारची देखील फसवणूक केली, असे आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर केले गेले होते आणि गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज