TOD Marathi

विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांचा काहीसा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नेहमीच्या सवयीप्रमाणे अजित पवार यांनी स्वतःचा उल्लेख आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री असा केला. मात्र, तो शब्द पूर्ण होण्याच्या आतच त्यात दुरूस्ती करत त्यांनी ‘विरोधी पक्षनेता’ असा उल्लेख केला. (Ajit Pawar got confused by referring to himself as the deputy cm)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस यांचं सरकार आलं. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होतं. सध्या त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आहेत.

नेमकं काय घडलं?
दौऱ्यादरम्यान, अजित पवार यांना एक प्रश्न विचारण्यात आला. यावरच उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “मला त्यासंदर्भात काही माहिती नाही. मी कालपासून दौऱ्यावर आहे. मी तिथे गेल्यानंतरच त्याची माहिती घेईन. आज मी राज्याचा उप..असे उपमुख्यमंत्री म्हणता म्हणता थांबले अन् विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्याशी बोलतो. असं म्हणाले. पुढे त्यामुळे मी पूर्ण माहिती घेऊन त्याआधारे स्टेटमेंट करेन. मी गेल्यानंतर सोमवारी त्याबद्दल माहिती घेईन.” असे वक्तव्य करत वाक्य पूर्ण केलं.