TOD Marathi

मुंबई : 

दिल्ली येथे पार पडलेल्या निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधानांकडे १८ हजार कोटींच्या विकास कामाचे प्रस्ताव पाठवले आहेत. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत उभे केल्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. आता या मुद्द्यावर भाजप नेते आ. प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (BJP Leader Pravin Darekar replied Rohit Pawar)

दरेकर म्हणाले की, हा काही अपमान करण्याचा उद्देश नाही, आता यांना मराठी माणसांचं पडलं आहे, आताप्रर्यंत कॉंग्रेस दिल्लीच्या तख्तापुढं पाणी भरायचं तेव्हा कुठं गेला होता यांचा स्वाभिमान? उद्या नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास निधी येईल, तेव्हा त्यांना कळेल महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हितं कसं सांभाळलं जातं. ही लोकं वैफल्याने ग्रासलेली आहेत, सत्ता गेल्याने त्याना आमच्यावर टीका करण्यापलीकडे दुसरं काही पडलेलं. मुंबई-महाराष्ट्राचं हीत जपण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असेही प्रवीण दरेकरांनी म्हणाले.

रोहित पवार काय म्हणाले होते?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभं केल्यावरून रोहित पवार यांनी ट्वीट (Rohit Pawar tweeted) केलं आहे,

एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!