टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 5 ऑगस्ट 2021 – राजकीय वर्तुळामध्ये काँग्रेसमधील बदलांची चर्चा सुरू असताना प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची साथ सोडलीय. प्रशांत किशोर यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये राजकारण कोणत्या वळणावर जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
राजनीतीकर प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिलाय. ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्याने अमरिंदर सिंग यांना धक्का बसल्याचे मानले जाते आहे.
सार्वजनिक आयुष्यातून थोडा वेळ विश्रांती हवी आहे, असे कारण देत प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिलाय. ‘सार्वजनिक आयुष्यापासून काही काळ दूर राहण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मुख्य सल्लागार पदाची कामं करण्यासाठी मी सक्षम नाही, असे राजनीतीकर प्रशांत किशोर यांनी म्हंटले आहे.
मला माझ्या भविष्यातील वाटचालींबद्दलही निर्णय घ्यायचा आहे. मी आपल्याला विनंती करतो की, मला या जबाबदारीतून मुक्त करा, असे प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिलेल्या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे.