नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (budget) संसदेत सादर केला आहे. केंद्र सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजेटचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून हे बजेट सामान्यांसाठी झिरो बजेट (Union Budget) ठरल्याची टीका करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी अस म्हणतात , या बजेटचा लाभ आपल्या देशातील युवा, मध्यमवर्ग, दलित, वंचितांना मिळणार आहे. या बजेटचं मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गरीबांचं कल्याण! प्रत्येक गरीबाकडे पक्के घर, नळाने पाणी, त्याच्याजवळ शौचालय, गॅसची सुविधा, या सगळ्यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यासोबतच आधुनिक इंटरनेट कनेक्टीव्हीटीवरही अधिक जोर देण्यात आला आहे.
पुढे बोलताना ते असही म्हणाले की, हिमालयीन भागांमध्ये जीवन सोपं सुरळीत व्हावं ही गोष्ट लक्षात घेत नवी घोषणा केली आहे. हिमचाल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर अशा क्षेत्रासाठी पहिल्यांदा ‘पर्वतमाला योजना’ घोषित करण्यात आली आहे. या योजना डोंगराळ भागातील ट्रान्स्पोर्टेशन आणि कनेक्टीव्हीटीसाठी काम करेल असही ते म्हणाले. यामुळे बॉर्डरलगतच्या सर्व गावांना फायदा होईल.
पुढे त्यांनी म्हटलंय की, या बजेटमधून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार, एमएसएमईची मदत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अर्थसंकल्पाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. त्यातून सर्वांना फायदा होणार आहे. यातून आत्मनिर्भरतेकडे मोठं पाऊल पडणार आहे. यातून लहान आणि अन्य उद्योगांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी सर्वांचे कौतुक करत म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमला या पीपल फ्रेंडली आणि लोकोपयोगी बजेटसाठी मी खूप अभिनंदन करतो. काल भाजपने मला सकाळी अकरा वाजता बजेट आणि आत्मनिर्भर भारतावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं आहे. उद्या अकरा वाजता मी या विषयावर विस्ताराने बोलेन असही ते म्हणाले.