TOD Marathi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प २०२२ जाहीर केला. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. रोजगार, विशेष आर्थिक क्षेत्र, जीएसटी इत्यादी गोष्टींवर काही प्रमाणात दिलासादायक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांनी ६० लाख जणांना रोजगाराची घोषणा करत पुढील वर्षात 80 लाख घरे उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले आहे.
देशाचे बजेट जाहिर करताना त्यात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक गोष्टींवर भर दिल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या बजेटमध्ये 1486 जे निरुपयोगी कायदे जे पंतप्रधान घरकुल आवास योजनेशी संबंधित आहेत ते काढून टाकण्याचा निर्णय सीतारामन यांनी घेतला आहे. सीतारामन यांनी आपला यावेळी चौथा अर्थसंकल्प जाहिर करताना वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला आहे.

सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे –

– 1486 जे निरुपयोगी कायदे आहेत त्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे.
– पीएमच्या योजनेला आणखी गती मिळावी यासाठी येत्या तीन वर्षात विशेष प्रयत्न केली जातील.
– शेतकऱ्यांविषयी काही महत्वाच्या घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत.
– गंगा किनारी 5 किमीच्या परिक्षेत्रात जैविक शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहेत.
– पीएम घरकुल आवास योजनेअंतर्गत 80 लाख नवीन घरांची निर्मिती केली जाणार आहे.

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट वाचून दाखवण्यास सुरुवात केली असतानाच शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार झाल्याचे दिसून आले. बीएसईचा सेंसेक्स हा 800 अंकांनी वधारला. सध्या सेसेंक्स हा 825 वरुन 58 हजार 840 वर पोहचला आहे. निफ्टीमध्ये देखील वाढ झाली आहे. तो 17 हजार 563 वर गेला आहे.