TOD Marathi

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 27 मे 2021 – अमेरिकेच्या फायझरने यंदा कोरोना लसचे सुमारे 5 कोटी डोस देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, यासाठी काही अटी घातल्या आहेत.

एक कोटी डोस जुलै महिन्यात, एक कोटी ऑगस्ट महिन्यात, सप्टेंबरमध्ये दोन कोटी तर ऑक्टेबर महिन्यात पुन्हा राहिलेले एक कोटी डोस असे फायझर देण्यास तयार आहे. जगात फायझरच्या 14.7 कोटी डोसचे वाटप केलं आहे. आतापर्यंत या लसचे कोणतेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत.

जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत लसीच्या तुटवड्याबाबत मागील आठवड्यात कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पररराष्ट्र मंत्रालय, नीति आयोग, जैव प्रौद्योगिकी विभाग, गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या दरम्यान, मॉडर्नाच्या लस पुढील वर्षी भारतात दाखल होणार आहे, अशी शक्यता आहे. त्यासाठी सिप्ला आणि अन्य भारतीय कंपन्यांशी चर्चा सुरूय. तर दुसरीकडे, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीकडून यंदा कोरोना लसचे डोस उपलब्ध होणार नाही.

‘या’ आहेत फायझरच्या अटी –
१. केवळ भारत सरकारसोबत कंपनीशी चर्चा करेल. तसेच भारत सरकारला डोसचे पैसे फायझर इंडियाला द्यावेत.
२. खरेदी केलेल्या डोसचे वितरण स्वत: भारत सरकारने करावे.
३. लस मिळविण्यासाठी भारत सरकारला नुकसानभरपाईचा करार करावा लागेल. यासाठी फायझर कंपनीने आवश्यक कागदपत्रेही पाठवलीत.
४. अमेरिकेसहित 116 देशांशी अशा प्रकारचा करार केल्याचे फायझरचे म्हणणे आहे.

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सध्या नागरिकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस दिले जात आहेत. आतापर्यंत २० कोटी लसीचे डोस दिलेत.

रशिया देशाची ‘स्पुतनिक व्ही’ या लसला भारत सरकारने मंजुरी दिलीय. मात्र, या लसचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज