कुठून आला हा ‘Covid 19’?; ज्यो बायडेन यांचे गुप्तचर यंत्रणांना आदेश, 90 दिवसात शोधा

टिओडी मराठी, दि. 27 मे 2021 – जगात थैमान घातलेल्या कोरोनाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. नेमका कोठून आला हा कोरोना विषाणू?, असा प्रश्न पडतो. म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बुधवारी गुप्तचर यंत्रणांना ‘कोरोना’चे जन्मस्थळ शोधण्यासाठीचे प्रयत्न वाढवा, असे आदेश दिलेत. 90 दिवसात ‘कोरोना विषाणू’ कुठून आला याचा शोध लावा, असे आदेश गुप्तचर यंत्रणांना देताना बायडेन यांनी अमेरिकी प्रयोगशाळांनी या संदर्भात गुप्तचर यंत्रणांना मदत करावी, असे म्हटले आहे.

प्राण्याच्या माध्यमातून करोनाचे माणसात संक्रमण झाले की चीनमधील प्रयोगशाळेतून अपघाताने? या विषाणूची साथ पसरली. याचा परत खोल तपास घेतला पाहिजे, अशा सूचना देताना ज्यो बायडेन यांनी चीनने या आंतरराष्ट्रीय तपासात सहकार्य करावे, असे अपील केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून लिक झाला नाही, असा खुलासा याअगोदर केला होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेचे निष्कर्ष पुन्हा तपासून पाहिले गेले पाहिजेत, असे ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने चीन प्रयोगशाळेला भेट देऊन गोळा केलेल्या डेटामध्ये जनावरे तपासणी डेटाकडे दुर्लक्ष केले होते, असे म्हटले आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने २०० पानी अहवाल सादर केला आहे. मात्र, त्यात अनेक त्रुटी आहेत, असे म्हटले जात आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या गुप्तचर अहवालात हा विषाणू जगात पसरण्याच्या अगोदर वुहान प्रयोगशाळेत काम करणारे तीन चीनी संशोधक आजारी पडले होते. त्यांनी हॉस्पिटल सेवाची मागणी केली होती, असे म्हटले आहे. ‘कोरोना’ची जगात १६.८५ कोटी लोकांना लागण झाली असून या साथीत ३५.०१ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

Please follow and like us: