TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 27 मे 2021 – ‘आयसीएआय’तर्फे घेण्यात येणाऱ्या सीए इंटरमिजीएट, फाइनल आणि पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्सेससह अन्य परीक्षा आता 5 जुलै 2021 पासून होणार आहेत. द इनस्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस्‌ ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्या वतीने सीए अभ्यासक्रम आणि अन्य परीक्षांचा सुधारित कालावधी जाहीर केलाय.

या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच संस्थेच्या www.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे., अशी माहिती ‘आयसीएआय’च्या परीक्षा विभागाचे अपर सचिव एस.के.गर्ग यांनी दिलीय.

कोरोनामुळे मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या या परीक्षा स्थगित केल्या होत्या. आता या परीक्षा जुलैपासून होणार आहेत.

सीए परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘आयसीएआय’ने दिलेल्या सूचनेनुसार चार्टर्ड अकाऊंटंट एंटरमिजिएट (ओल्ड स्किम), इंटरमिजीएट (न्यू स्किम) आणि फायनल (ओल्ड आणि न्यू स्किम) आणि इनश्युरन्स ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट, टेक्निकल एक्झामिनेशन ॲण्ड इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्टच्या मे- २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षा आता ५ जुलै २०२१ पासून होणार आहेत.