TOD Marathi

World Youth Skills Day निमित्त जाणून घेऊया, Skill India बाबत, तरीही भारतात बेरोजगारी अधिक का?

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 15 जुलै 2021 – संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये सन 2014 साली नोव्हेंबर महिन्यात १५ जुलै हा दिवस ‘जागतिक युवा कौशल्य दिवस’ म्हणून घोषित केला. तरुणांना रोजगार आणि उद्योग निर्मिती करण्यासाठी गरजेच्या असलेल्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट या दिवसामागे ठेवले आहे. भारतात 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कौशल्य भारत’ म्हणजेच ज्याला आपण ‘स्किल इंडिया’ म्हणून ओळखतो त्याची घोषणा केली. ‘ मात्र, आज पाच वर्षानंतर या योजनेचा फायदा किती युवकांना झाला आहे किंवा होत आहे? याचा आढावा आज आपण घेणार आहोत.

भारत देश हा तरुणांचा देश म्हणून जगात ओळखला जातो. मात्र, देशातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. पदवी किंवा पदवीधर असूनही अनेक युवकांना रोजगारासाठी भटकावे लागते. देशात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी नरेंद्र मोदी यांनी ‘स्किल इंडिया’ ही योजना सुरू केली. ‘स्किल इंडिया’ या योजनेची घोषणा करताना नरेंद्र मोदींनी एक विधान केलं होतं, ‘चीनप्रमाणेच भारतानेसुध्दा जगात कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणारा देश म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करेल.

‘स्किल इंडिया’ योजना :
युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना सुरू केली. युवकांच्या कौशल्याच्या बळावर व त्याचा योग्य वापर करून नौकरी तसेच स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी युवकांना या ‘स्किल इंडिया’ योजनेच्या माध्यमातून सरकार मदत करत राहणार आहे. स्किल इंडियामार्फत देशातील सुमारे ४० कोटी तरुणांना विविध योजनांअंतर्गत २०२२ पर्यंत ५०० प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंटच्या आकडेवारीनुसार १९ जानेवरी २०२१ पर्यंत एकूण १.०७ करोड युवकांनी या योजनेतून ट्रेनिंग घेतलीय. यापैकी ४६. २७ लाख युवकांनी शॉर्ट टर्म ट्रेनिंग घेतलीय. आता या ४६ लाख युवकांमधून १९ लाख युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगार मिळाल्याची माहिती स्किल इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केली आहे.

ट्रेनिंग घेणाऱ्या युवकांची संख्या जरी अधिक असली तरी प्रत्यक्षात त्यातून रोजगार मिळणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या एका वृत्तानुसार, केवळ १५% युवकांना या योजनेतून रोजगार मिळालाय. तसेच ही योजना युवकांना स्वतःचा व्यवसाय निर्मितीसाठी मदत करत आहे. मात्र, आकडेवारीनुसार ६ लाख १५ हजार मधून केवळ २४ टक्के युवकांनीच स्वतःच्या व्यवसाय सुरु केले आहेत.

मग, रोजगार का मिळत नाही ?
रोजगार निर्मितीसाठी केवळ योजना असून चालणार नाही. योजना असल्या तरी ट्रेनिंग कशा पद्धतीची मिळते ? हे इथे महत्वाचे ठरते. आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. मात्र, त्याप्रमाणे रोजगार देणाऱ्या कंपन्या किंवा संस्था कमी आहेत. जरी असल्या तरी ‘वॅकन्सी’ अर्थात पद भरती नसण्याचा फटका अनेक तरुणांना बसतो. म्हणून अनेकांना रोजगार मिळत नाही.

एका सर्वेक्षणानुसार, देशातील केवळ ३.५ टक्के युवक कौशल्य विकासाबाबत अग्रेसर आहेत. इतर देशांचा विचार केला तर ही टक्केवारी अधिक आढळली आहे. उदाहरणार्थ चीनमध्ये ४५ टक्के युवक कौशल्य विकासात अग्रेसर आहेत. हीच टक्केवारी अमेरिकेमध्ये ५६, जर्मनीत ७४, जपानमध्ये ८० तर दक्षिण कोरियामध्ये ९६ टक्के इतकी आहे.

रोजगार निर्मितीसाठी कौशल्य महत्वाचे आहे. मात्र, त्यासोबत शिक्षणाची व शिकवण्याची पद्धत महत्वाची आहे. शिक्षण क्षेत्रात बदल होणे गरजेचं आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत मागे असण्याच कारण हेच आहे. आता येत्या काळात कौशल विकास योजनतेतून किती युवकांना रोजगार मिळतो? आणि किती प्रमाणात उद्योग निर्मिती होते? हे पाहणं गरजेचं आहे. कारण, आता प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचं नवीन व्हर्जन आलंय, ज्याला नाव दिले आहे ‘PMKV 3.0’.

आज या ‘यूथ स्किल डे’च्या निमित्ताने TOD टाइम्स ऑफ डेमॉक्रसिच्या वतीने आपण एकंदरीत स्किल इंडिया या योजनेचा आढावा घेतला आहे. त्यासोबत तरुणांनी कौशल्य विकासावर अधिक जोर देणे गरजेचं आहे.