TOD Marathi

‘इथं’ आहे सर्वांत ठेंगणी गाय Queen , उंची केवळ दीड फूट ; वेधून घेतेय सर्वांचं लक्ष, Guinness Book मध्ये नोंद होणार

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, ढाका, दि. 15 जुलै 2021 – जगात अजब-गजब बाबींची नोंद केली जाते. यासाठी गिनीज बुक, लिम्का बुक अशी अनेक ठिकाणं आहेत, तिथं अशा गोंष्टींची नोंद ठेवली जाते. आपण मनुष्य प्राण्यांत देखील सर्वांत उंच व्यक्ती आणि सर्वांत बुटका किंवा खुजा व्यक्ती कोण आहेत? याची माहिती घेतली असेल. कारण, याचीही नोंद घेतलेली आहे. मग, इतर प्राण्यांची नोंद घेतली जाणारच ना… जगात सर्वांत लहान गाय आहे. तिची उंची केवळ वीस इंच आहे. आश्चर्य वाटलं ना… जाणून घेऊया, याबाबत सविस्तर माहिती.

सध्या सर्वांत लहान गायीची चर्चा होत आहे. केवळ 20 इंचाची म्हणजे सुमारे दीड फूट उंचीची हि गाय असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचा जगातील सर्वात लहान गाय असल्याचा दावा केला जातोय.

केवळ 20 इंचाची हि गाय बांग्लादेशमध्ये दिसली आहे. तिचं नाव राणी असं ठेवलं आहे. ढाकाजवळील एका फार्ममध्ये ही गाय राहत असून ती आता 23 महिन्यांची आहे. तिला पाहताच एखादं वासरू आहे, असं वाटतं पण,हि गाय वासरापेक्षा लहान आहे.

या राणी गायीला पाहण्यासाठी गर्दी होते. कोरोना, लॉकडाऊनमध्येही लोक दूरदूरहून या गायला पाहण्यासाठी येत आहेत. तीन दिवसांत 15,000 पेक्षा अधिक लोक आले होते, असे या गायीच्या मालकानं सांगितलं आहे.

आतापर्यंत जगामधील सर्वात छोटी गाय भारतातील केरळ राज्यात आढळली आहे. जिचं नाव माणिक्यम असं आहे. जिची उंची 2014 साली 24 इंच होती. या राणीची उंची केवळ 20 इंच अर्थात सुमारे दीड फूटच आहे.

शिकोर एग्रो फार्मचे मालक एम. ए. हसन हाऊलाडर यांनी या गायीचा आकार मोजून दाखवला आहे. पण, अद्याप ती जगातील सर्वात लहान गाय ठरली आहे. याची पुष्टी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने केलेली नाही.

गायीच्या मालकाच्या मते, गिनीज वर्ल्डने या गायीला आपल्या लिस्टमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी घेतला आहे. गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यानंतर ही जगातील सर्वात छोटी गाय ठरणार आहे.