TOD Marathi

गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये 2200 ST बसेस सोडणार ; 16 July पासून करा Booking, ॲड. Anil Parab यांची माहिती

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जुलै 2021 – गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. तर १४ सप्टेंबरपासून या बसेस परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

यावेळी मंत्री अनिल परब म्हणाले, गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी जातात. त्यामुळे दरवर्षी या उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी बसेस धावत असते.

मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा बसेस उपलब्ध करून देणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा एसटी बसेस कोकणातील रस्त्यावर धावणार आहेत, असेही त्यांनी सांगितलं आहे.

गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या एसटी बसेसचा प्रवास सुरु होईल. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या बसेस कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षण सुरु होणार आहे.

चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार आहेत. प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक केले जाणार आहे.

गणेशोत्सवा रम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.

तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक तैनात केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज