आता Police शिपाईही होतील PSI ; गृहमंत्री वळसे-पाटील यांचा प्रस्ताव

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 जुलै 2021 – पोलीस दलात शिपाई असणाऱ्यांना आता निवृत्त होईपर्यंत पीएसआय पदापर्यंत जाता येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री वळसे-पाटील सादर करणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिलीय.

पोलीस दलात शिपाई पदावर काम करणाऱ्यांना निवृत्त होईपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार केला जात आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार आहे, असे दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

आतापर्यंत संबंधित पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होत आहेत. मात्र, आता हे निकष तर असतील पण त्यासोबत या प्रस्तावानुसार तरूण एक शिपाई म्हणून जरी पोलीस खात्यात भरती झाला तर त्याला पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे, यासाठी गृृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे.

येेत्या 5 आणि 6 तारखेला अधिवेशन होणार आहे. अगोदर अधिवेशनावरून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. या अधिवेशनानंतर गृहविभाग या प्रस्तावाबाबत निर्णय घेणार आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर पोलीस विभागात हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

Please follow and like us: