TOD Marathi

पुणे :
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने महाविकास आघाडी आणि विरोधक ओरडत आहेत. मात्र, केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात येऊ का दिले नाही?  याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं. महाविकास आघाडीचं तत्कालीन सरकार याला जबाबदार आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Union Minister Nirmala Sitharaman) यांनी केला. आणि शिवसेनेसह (Uddhav Thackeray Shivsena) राष्ट्रवादी (Sharad Pawar ncp) आणि काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सत्ताधारी तसेच विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता याच प्रकल्पावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुण्यात बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नाणार सारखा प्रकल्प जो आशियामधील सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होता, त्याला कोणी रोखलं? तसेच आरे मेट्रो कारशेडसारखा प्रकल्प होऊ दिला नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला? हे सर्वांना माहित आहे. हे प्रकल्प झाला असता तर याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणार होतं म्हणून हे प्रकल्प थांबवण्यात आला आहे. राज्यातून एक प्रकल्प गेल्याने विरोधक आरडाओरडा करत आहेत. पण देशातील प्रमुख चार प्रकल्प कोणी थांबवले? याचे उत्तर महाविकास आघाडीने द्यावे आणि मगच आम्हाला प्रश्न विचारावा, असा जबरदस्त टोला सितारामन यांनी लगावला आहे.सहकार क्षेत्रात अनेकांनी आपली राजकीय पोळी शेकली. पण त्यापैकी कोणीही वेगळं मंत्रालय बनवण्यासाठी प्रयत्न केला नाही. सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवलं. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे.  शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, असंही निर्मला सितारामन म्हणाल्या.