TOD Marathi

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली. यामध्ये काही मंत्र्यांना एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर टीका केली आहे. एका एका मंत्राला सहा सहा जिल्ह्यांचं पालकमंत्री पद देण्यात आलं. पालकमंत्री काय स्पायडरमॅन सारखे काम करणार का असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.

अमरावतीमधील स्त्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तातडीने तिथल्या बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. या घटनास्थळाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Congress State President) माजी मंत्री आमदार यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र पालकमंत्री किती आवश्यक आहेत हे देखील त्यांनी स्पष्ट केलं.