TOD Marathi

महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार जर राज्यात अस्तित्वात असतं तर निवडणुका लवकर लागल्या असत्या असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) लांबल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तान (Pakistan) जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांना आणि त्यांचे सूत्रधार शोधा अशी मागणी देखील सरकारकडे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

भाजप आणि शिंदे गट एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो तर काय कल येतील, याचा अंदाज अजूनही कदाचित त्यांना आला नसेल, प्रभाग तीनचा की चारचा याबद्दलही त्यांची स्पष्टता नसेल आणि म्हणून ते निवडणुका पुढे पुढे ढकलत आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. असं देखील ते म्हणाले.

गेले काही दिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार अशी चर्चा आहे. मात्र, कुठल्याही महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांची घोषणा झालेली नाही या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.