पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI Case) विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) रविवारी मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तेलंगाणा (Telangana) राज्यात एनआयएनं 40 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
रविवारी एनआयएनं 40 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत चार जणांना ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) तेलंगणामध्ये 38 ठिकाणी (निजामाबादमध्ये 23, हैदराबादमध्ये चार, जगत्यालमध्ये सात, निर्मलमध्ये दोन, दिलाबाद आणि करीमनगर जिल्ह्यात एक एक ठिकाणी छापेमारी) आणि आंध्र प्रदेशमध्ये दोन ठिकाणी (कुरनूल आणि नेल्लोर जिल्ह्यात एक एक ठिकाणी) छापेमारी केली आहे.
NIA conducts searches at multiple locations in Telangana & Andhra Pradesh in a case registered against PFI cadres in Nizamabad by Telangana Police on 4th July, which was later taken over by the NIA pic.twitter.com/wU8wSD2CeQ
— ANI (@ANI) September 18, 2022