TOD Marathi

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आजपासून पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. खरंतर शिंदे गट भाजपसोबत युती केल्यानंतरच मनसे युतीचा भाग होणार अशा चर्चा सुरू होत्या. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज ठाकरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. त्यामुळे भाजप, शिंदे गट आणि मनसे अशी युती होणार का? हा एकच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

अशातच राज ठाकरे आपल्या विदर्भ दौऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बावनकुळे आणि ठाकरे यांच्यातील ही भेट नक्की पुढील राजकीय समीकरण ठरवण्यासाठी महत्त्वाची असणार आहे.

बावनकुळे आणि ठाकरे यांच्यातील ही भेट केवळ औपचारिक असेल किया भेटीत युतीचे बाराखडी गिरवली जाईल? याबाबत मात्र अद्याप कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही.