नेपाळमधील बेपत्ता विमान सापडलं; 22 प्रवाशांसह 4 भारतीयांचा समावेश

काठमांडू :  नेपाळमधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथे दुर्घटनाग्रस्त विमान आढळून आलं आहे. नेपाळच्या लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात अखेर यश आलं आहे.

रविवारी चार भारतीयांसह 22 जणांसह बेपत्ता झालेलं दुर्घटनाग्रस्त विमान सापडलं आहे. नेपाळ लष्कराने विमानाचं अपघातस्थळ शोधलं आहे. नेपाळमधील मुस्तांग भागात हा विमान अपघात झाला आहे.

नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथील सनोसवेअर येथे दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडलं आहे. लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल नारायण सिलवाल यांनी विमानावर क्रमांक स्पष्टपणे दिसत असलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाच्या फोटोसह ट्विट केले आहेत. विमानातील 22 प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.

नेपाळ सैन्याच्या शोध आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला आहे. बचाव दलाकडून सध्या तपास सुरु आहे.

Please follow and like us: