TOD Marathi

नागपूरकडून हिंगणीमार्गे वर्धाकडे जाणारी एक खाजगी बस उलटली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यापैकी 5 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय.अजूनपर्यंत तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागपूर (Nagpur Accident) जिल्ह्यातील हिंगणी-सेलू (Hingani-Selu Rout) मार्गावरील पेंढरी जवळ हा अपघात झाला आहे. पेंढरी घाटातील वडणावर चालकांची नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक लोकांकडून मिळतेय. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात रवाना केलंय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.

भरधाव वेगामुळे खासगी बस चालकाचं वळणावर नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला असावा, अशी शंका घेतली जातेय. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून पुढील बचावकार्य केलं जातंय.
गेल्या 12 तासांच्या आत विदर्भात दुसरा भीषण झाला आहे. पहाटे बुलढाण्यात एका एसटी बसने तिघांना चिरडलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे या एसटी बसचा उजव्या बाजूचा पत्रा बाहेर आलेला होता. तो दोघांना लागल्याने त्यांचा हातच थेट कापला गेला. तर धडक बसल्याने तिसरी व्यक्ती दूरवर फेकली गेली. अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही खासगी बसचा अपघात झाला आहे. त्यामुळे विदर्भात अपघात सत्र सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळालंय.