नीट पदव्युत्तर पदवीसाठीची परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयने स्थगित केली आहे. नीटची परीक्षा १२ मार्च रोजी होणार होती. आता ही परीक्षा सहा ते आठ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली असून मे-जून महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
नीट पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी होणार होती. नीट पीजीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, कोविड महामारी मुळे त्यांना इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही. त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा होता. ही इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी ३१ मे २०२२ ची मुदत देण्यात आली होती.
शेकडो MBBS पदवीधर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास होणार होती मोठी अडचण
सुप्रीम कोर्टात धाव घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे म्हटले की, कोरोना महामारीच्या आजारात सुरू असलेल्या कर्तव्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही. इंटर्नशिप पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांना NEET PG परीक्षा देता आली नसती. त्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली असल्याचा सुप्रीम कोर्टात धाव घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर NEET PG काउंसलिंग सुरू झाली होती. गतवर्षीच्या विद्यार्थ्यांची ही काउंसलिंग सुरू आहे. या काउंसलिंगच्या प्रक्रियेला टाळण्यात येत होते. निवासी डॉक्टरांनी या मुद्द्यावर देशभरात आंदोलन केले होते. तसेच दिल्लीतील रुग्णालयातही मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर काउंसलिंग प्रक्रिया सुरू झाली.