TOD Marathi

अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षीत गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाचा ट्रेलर येत्या ४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. सिनेमाचे अनेक पोस्टर आजवर रिलीज झालेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा लांबणीवर पडला होता. संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केल्यानंतर निर्मात्यांनी आता सिनेमाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. सोबतच सिनेमाचे नवीन पोस्टर देखील लाँच करण्यात आले आहे.

नवीन पोस्टर शेअर करत आलिया म्हणते की, ‘गंगू येत आहे. ४ फेब्रुवारीला ट्रेलर रिलीज होईल’. पोस्टरमध्ये आलिया भट्ट बिछान्यावर बसलेली दिसून येत आहे. तिने सफेद साडी आणि डोळ्यात मोठे काजळ भरले आहे. कपाळावर लावलेल्या मोठ्या लाल टिकलीने आलियाच्या लूकला चार चाँद लावले आहेत. आलियाचा हा कातीलाना अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडला आहे.

गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा माफिया क्विन गंगूबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमातून आलिया गंगूबाईंच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मुंबईच्या कामाठिपुरा परिसरातील गंगूबाई ते माफिया क्विन असा प्रवास सिनेमातून दाखवण्यात येणार असून हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या द माफिया क्विन ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारीत आहे.

माफिया क्वीनची खरी कहाणी…

गंगूबाई काठियावाडी या सिनेमा याआधी १८ फेब्रुवारी २०२२ ला रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. अखेर कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 25 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाचा प्रीमियर प्रतिष्ठित 72व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.