TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 जुलै 2021 – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुजबुज सुरू झाली होती. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसने पटोले यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे महाविकास आघाडीत सामील असलेल्या दोन पक्षांत मतभेद निर्माण झालं आहे.

नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवलं जात आहे, असा केलेला आरोप हा माहिती अभावी आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन आरोप करावेत, असे नवाब मलिक म्हणाले. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी विविध विषयावर भाष्य केलं.

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो? ते सगळं त्यांना माहीत आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असा आरोप केला होता.

कोणतही सरकार सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष ठेवतं. हे आताच होतंय असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होत असतं.

नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी, अस नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.